या पुस्तकातून व्यापक जाणीव-जागरूकतेचा जो जागर केला आहे, तो प्रगल्भ लोकशाहीसाठी आवश्यक असणाऱ्या सुजाण नागरिकांना विवेकी, विचारी व विज्ञाननिष्ठ बनवण्यासाठी साहाय्यकारी होणारा आहे

डॉ. अभिजित वैद्य हे नामांकित हृदयरोग तज्ज्ञ गेली अनेक वर्षे ‘आरोग्यसेने’मार्फत एक सामाजिक बांधीलकी मानून पूर, भूकंप झालेल्या भागात तातडीनं वैद्यकीय सेवा देत आहेत. विषयाचा सखोल अभ्यास, त्यातली सामाजिक, आर्थिक, राजकीय गुंतागुंत नेमकेपणानं मांडत स्वत:च्या प्रज्ञेनं त्यावर भाष्य करणं, यामुळे या अग्रलेखांना वैद्य तात्विक मूल्यप्रदान करत, तिला वैचारिक निबंधाचे रूप प्राप्त करून देतात.......

संमेलनाध्यक्षपदी दिब्रिटोंची निवड करणं, ही आजच्या कलुषित सांस्कृतिक वातावरणाच्या व धार्मिक असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर, हे महामंडळानं केलेलं एक जबरदस्त ‘पॉलिटिकल स्टेटमेंट’ आहे!

धार्मिक कारणावरून फादर दिब्रिटोंना विरोध करणारे त्यांचं वसईतलं कार्य लक्षात घेत नाहीत. आज मुंबई अमराठी म्हणजे इंग्रजी मोठ्या प्रमाणात झाली आहे, पण वसईचं मराठीपण आजही कायम आहे. त्यामध्ये फादर दिब्रिटो व त्यांच्या ‘सुवार्ता’ या मासिकाचा मोठा हात आहे. या परिसरातील मराठीत लिहिणाऱ्या ख्रिश्चन लेखक-कवींची एक दमदार फळी आज साहित्यप्रांती आपली नाममुद्रा कोरत आहे.......

संमेलनाध्यक्षपदी दिब्रिटोंची निवड करणं, ही आजच्या कलुषित सांस्कृतिक वातावरणाच्या व धार्मिक असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर, हे महामंडळानं केलेलं एक जबरदस्त ‘पॉलिटिकल स्टेटमेंट’ आहे!

फादर दिब्रिटो यांची संमेलनाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल महामंडळाचं अभिनंदन! त्यांनी काय विचार केला माहीत नाही. पण आजच्या कलुषित झालेल्या सांस्कृतिक वातावरणाच्या व धार्मिक असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर फादर दिब्रिटोंची निवड करणं, हे महामंडळानं केलेलं एक जबरदस्त ‘पॉलिटिकल स्टेटमेंट’ आहे! मुक्तीबोध यांनी ‘पार्टनर तुम्हारा पॉलिटिक्स क्या है’ असा भेदक प्रश्न विचारला होता, त्याची आठवण या निर्णयामुळे झाली.......

आयोजक संस्थेने व महामंडळाने झुंडशाहीपुढे व दबावापुढे जो लोटांगण घालण्याचा भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी प्रक्षुब्ध आहे!

यवतमाळच्या आयोजक संस्थेने व महामंडळ, त्याचे अध्यक्ष यांनी उद्घाटक म्हणून भारताच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निर्भीड पुरस्कार करणाऱ्या कार्यकर्त्या नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आधी निमंत्रण देऊन मग ते मागे घेतल्याचा जो अगोचरपणा आणि झुंडशाहीपुढे व दबावापुढे लोटांगण घालण्याचा जो भिरूपणा दाखवला, त्यामुळे मी उदास आहे, चिंतीत आहे आणि त्याहून जास्त प्रक्षुब्ध आहे.......